सांगली : अल्पवयीन विद्यार्थीनीस जबरदस्तीने पळवून नेवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवून न्यायमूर्तींनी आरोपी महादेव बिरंगे (२६ , ता. तासगाव ) यास दहा वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली .
ही घटना नोव्हेंबर २०१५ सालात घडली होती. पिडीता आपल्या कुटुंबियासमवेत तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे राहत होती .
या विद्यार्थीनीस आधारकार्ड काढण्यासाठी तासगाव येथे जायचे असल्याने महादेवने तिला सोडते असे सांगून दुचाकीवरून तासगाव घेऊन गेला. त्यानंतर आरोपीने तिला टाकळी येथे भाच्याकडे जावू असे सांगितले. तिने नकार दिल्यास आरोपीने तिला धमकावित तिला टाकळीला घेऊन गेला.
रात्रीपर्यंत मुलगी परतली नसल्याने पालकांनी तासगाव ठाण्यात तक्रार दाखल केली असता आरोपींच्या मोबाईलची डिटेल्स काढण्यानंतर तो भाच्याचा घरी असल्याचे समजताच सापळा रचत धाड टाकली.
त्यानंतर पिडीतेची आरोपीच्या ताब्यातून सुटका केल्यानंतर पिडितेने आरोपीने अत्याचार केल्याचे सांगितले.













