शिवसेना हा अस्तित्त्व संपत चाललेला पक्ष भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-  शिवसेना हा अस्तित्त्व संपत चाललेला पक्ष आहे असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली आहे.

तसंच संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेबद्दल विचारलं असता कोण संजय राऊत? असं विचारत त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला आहे. सत्ता असा हा एक फेविकॉल आहे तो चिकटून बसतो. विविध प्रकारचे अपमान सहन करायला लावतो.

राष्ट्रवादी खूप महत्त्व घेते आहे. काँग्रेस असून नसल्यासारखा पक्ष आहे आणि शिवसेनेचं अस्तित्त्व संपत चाललं आहे असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे ही कुठे तरी वादाची सुरुवात आहे असं मला वाटत नाही. पदरात काही पाडून घ्यायचं असेल तर नाराजी व्यक्त करायची आणि मग हवं ते मिळालं की नाराजी दूर करायची असा साधारणतः पॅटर्न आहे.

मात्र पहिल्यांदाच सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. त्यामुळे पुढे काय ते पहावं लागेल. आत्ता ज्या विधानपरिषद निवडणुका झाल्या त्यात आमची एक सीट जिंकली.

इतर पाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आहेत. शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे शिवसेना अस्तित्त्व संपत चाललेला पक्ष आहे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment