सावधान! राज्यातील या भागात मेघगर्जनेसह पाऊस होणार ! अतिवृष्टीचा इशारा …

Published on -

मुंबई: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळं ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या महा चक्रीवादळामुळे 6 ते 8 नोव्हेंबर 2019 पर्यंत उत्तर कोकणासह उत्तर मध्य महाराष्ट्राला मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

‘महा’ चक्रीवादळादरम्यान समुद्रामध्ये वाऱ्याचा वेग जास्त असणार आहे. त्यामुळे मच्छिमारांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी पुन्हा किनाऱ्यावर येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व परिस्थिची सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला दुष्काळाचं सावट निर्माण झालेल्या मराठवाडा, विदर्भात आता परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसामुळं पिकांचे नुकसान झाल्यानं हवालदिल झालेल्या शेतकऱ्याच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe