Dam In Maharashtra:- राज्यातील धरणांचा विचार केला तर शेती आणि पिण्याच्या पाणी या दृष्टिकोनातून खूप महत्त्व असून राज्यातील बऱ्याच धरणांची वाटचाल सध्या 100% कडे सुरू असल्याचे सध्या चित्र आहे. आपण या वर्षाचा पाऊस पाहिला तर साधारणपणे जून महिन्यातील सुरुवात ही निराशाजनक झाली होती व त्यानंतर मात्र जुलैमध्ये चांगला पाऊस पडला होता. परंतु ऑगस्ट महिना हा संपूर्णपणे कोरडा गेल्यामुळे राज्यातील धरणांचा पाणीसाठा कमालीचा खालावलेला होता व पाऊस जर झाला नाही तर पिण्याच्या पाण्याचे देखील संकट उद्भवण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.
परंतु सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे अनेक धरणे हे 100% भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे राज्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल अशी तरी तूर्तास शक्यता निर्माण झाली आहे. याच अनुषंगाने रविवारी आतापर्यंत राज्यातील धरणांचा पाणीसाठा किती होता हे आपण जिल्हानिहाय जाणून घेणार आहोत.

राज्यातील जिल्हानिहाय धरणातील पाणीसाठा( टक्केवारीत )
1- अहमदनगर( दक्षिण)- येडगाव 25.80%, वडज 99.34%, माणिक डोह 68.44%, डिंभे 98.39%, घोड 37.73%, मां.ओहोळ 5.94%, घा. पारगाव 6.18%, सीना 25.67%, खैरी 13.78%, विसापूर 25.59% आणि पिंप. जो 77.10%
2- अहमदनगर (उत्तर)- भंडारदरा 99.41%, निळवंडे 83.35%, मुळा ८१.१३ टक्के, आढळा 100% आणि भोजापूर 100%
3- नासिक– गंगापूर 95.8%, दारणा 97.10%, कडवा ९१.७१%, पालखेड 97.8%, मुकणे 84.92% आणि करंजवण 88.25%
4- जळगाव जिल्हा– गिरणा 50.42%, हतनूर 81.57%, वाघुर 69.31%, मन्याड 0.00%, गुळ 80.14%, अनेर 81.59%, प्रकाशा 68.46%, उ.कई 75.85%
5- बृहन्मुंबई महानगरपालिकेतील धरणे– मोडक सागर शंभर टक्के, तानसा 99.2%, विहार शंभर टक्के, तुलसी 100%, म. वैतरणा 96.98%
6- ठाणे आणि रायगड जिल्हा( कोकण विभाग)- भातसा 98.75%, अप्पर वैतरणा 91.92%, बारावे 97.93%, मोराबे 97.47%, हेटवणे 93.92%, तिलारी 81.86%, अर्जुना शंभर टक्के, गड नदी 80.8% आणि देवघर 84.53%
7- मराठवाडा विभाग– जायकवाडी धरण 49.98%, येलदरी 61.14%, माजलगाव 12.56%, पेनगंगा( ईसापुर) 70.36%, तेरणा 25.92%, मांजरा 24.78%, दुधना 25.81% आणि विष्णुपुरी 86.53%
8- पुणे विभाग– चासकमान शंभर टक्के, पानशेत 99.86%, खडकवासला 48.86%, भाटघर 96.17%, वीर 56.7%, मुळशी 90.94%, पवना शंभर टक्के, उजनी 62.65%, कोयना 82.24%,धोम 75.22%, राधानगरी 99.45% आणि दूधगंगा ८८.३७%
9- नागपूर विभाग– उर्धवर्धा 95.95%, काटेपूर्णा 72.68%, गोसीखुर्द 65 टक्के, तोतला डोह 95% आणि खडकपूर्णा 4.69%
अशाप्रकारे रविवार पर्यंत सकाळी सहा वाजता राज्यातील धरणांचा पाणीसाठा होता.