अकोले :- मधुकर पिचड व वैभव पिचड यांची ४० वर्षांची सत्ता उलथवणारे आमदार डाॅ. किरण लहामटेंचा समावेश मंत्रिमंडळात करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अशोक भांगरे, अमित भांगरे यांनी केली.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्यामुळे अकोले व संगमनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांनी गुलालाची उधळण करत फटाके फोडले. पेढे वाटून आनंद व्यक्त केला. भांगरे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मालकीची जागा भंडारदरा धरणाच्या परिसरात आहे.
त्यामुळे ठाकरे घराण्याबद्दल आदिवासी जनतेच्या मनात आदराची भावना आहे. आमदार डाॅ. लहामटे यांच्या रूपाने आदिवासी समाजाला मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व मिळाले, तर हा आनंद द्विगुणीत होईल.
Latest News Updates
ती जेव्हा – जेव्हा शेतात जायची तेव्हा-तेव्हा तिच्यावर बलात्कार व्हायचा…!
भगतसिंह कोशारींची होणार हकालपट्टी, कलराज मिश्र होणार नवे राज्यपाल?
प्रेमासाठी वाट्टेल ते…पाकिस्तान सोडून आली भारतात, लग्नही केलं, नंतर….
पगार वाढीची वाट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर