आता शिर्डीचा सूर्यच मावळलाय, जनतेलाही काही कळेना काय करावे ते !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- राज्यात आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे कोणाला घाबरण्याचं कारण नाही. कोणाच्या सांगावांगीवर विश्वास ठेवून वेगळं पाऊल उचलू नका. केंद्र सरकारच्या सीएए, एनपीआरचा राज्यातील लोकांना त्रास होऊ देणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार लोकांसाठी काम करणारं आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला आश्वस्त केलं.

कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथे राज्य सरकारतर्फे आयोजित केलेल्या महाराजस्व अभियानासाठी पवार आले होते.यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याह मंत्रीमंडळ उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादीने चांगले यश मिळवले. शिर्डी तदारसंघात प्राबल्य कमी आहे. शिर्डीची जनता जिकडे सूर्य (विखे) तिकडेच जातात. मात्र आता शिर्डीचा सूर्यच मावळलाय, जनतेलाही काही कळेना काय करावे ते, अशी टीका उपमुख्यंत्री अजित पवार यांनी आमदार राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता केली.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जि. प. अध्यक्षा राजश्री घुले, आमदर . रोहित पवार, आमदर. डॉ. सुधीर तांबे, आमदर . लहु कानडे, घनश्या शेलार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आ. किरण लहाटे, संपत कपाळे, बाबासाहेब भोस, मजुषा गुंड, संदीप वर्पे, र्निला मालपाणी आदी उपस्थित होते.

माहीजळगाव येथे माहाराजस्व अभियानाचे उद्घाटन केल्यानंतर तेथे लावण्यात आलेल्या विविध शासकीय स्टॉलला प्रमुख पाहुण्यांनी भेटी देवून पहाणी केली. विविध योजनांच्या लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप उपमुख्यंत्री अजित पवार, पालकंत्री हसन मुश्रीफ , जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

उपमुख्यंत्री अजित पवार म्हणाले,कर्जत-जामखेड मधील जनतेने जो विश्‍वास टाकला तो सार्थकी लावून मतदार संघातील प्रत्येक विकास कमाला आम्ही कटीबद्ध आहोत. तळागाळातील घटकाला विकासापासून वंचित ठेवणार नाही. पाणी योजना, कुकडीचे पाणी, रस्ते, चौंडीच्या विकासासाठी प्रयत्नशिल असून कोणत्याही कामाला निधी की पडू देणार नाही.

दरम्यान या कार्यक्रमाला या भागातील खासदार डॉ. सुजय विखे यांना निमंत्रण न दिल्याची चर्चा होती. यावर भाष्य करताना पवार म्हणाले, ‘हा कार्यक्रम राज्य सरकारचा आहे. त्यामुळे खासदारांना निमंत्रण देण्यात आलेले नाही.’माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना टोला लगावताना अजित पवार म्हणाले,’ विखे यांना सूर्य तिकडे उगवेल असे वाटले होते. पण तसे झाले नाही आणि त्यांची फसगत झाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment