Destination Wedding Places:- आयुष्यामध्ये असे अनेक खास प्रसंग असतात की ते प्रसंग इतरांपेक्षा वेगळे किंवा कायम आठवणीत राहतील अशा प्रकारे साजरा करण्याचा प्लान बऱ्याच जणांचा असतो. जर आपण आयुष्यातील खास प्रसंग पाहिला तर यामध्ये लग्न या समारंभाचा समावेश करता येईल.
जर आपण आयुष्यातील खास प्रसंग पाहिले तर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येणारा अतिशय स्पेशल आणि महत्त्वाचा प्रसंग म्हणजे लग्न होय. लग्न हा एक असा प्रसंग असतो की तो आयुष्यात फक्त एकदाच येतो आणि लग्नामुळे दोन जीवांचे किंवा दोन मनांचेच मिलन नाहीतर दोन कुटुंबे मनाने आयुष्यभरासाठी एकत्र येत असतात व या दृष्टिकोनातून लग्न सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व असते.
त्यामुळे प्रत्येकाची इच्छा असते की लग्नासारखा कार्यक्रम हा कायम आयुष्यात राहील व त्या दृष्टिकोनातूनच लग्नाची प्लॅनिंग करण्यात येते व त्याच्या त्याच्या आर्थिक कुवतीनुसार करत असतो. बऱ्याचदा आपल्याला माहित आहे की मोठे मोठे लॉज, मंगल कार्यालय इत्यादी ठिकाणी प्रामुख्याने लग्न समारंभ पार पडतात. परंतु बरेच व्यक्ती लग्न समारंभ हे एखाद्या निसर्गाच्या सुंदर अशा सानिध्यामध्ये पार पाडण्याची प्लॅनिंग करत असतात.
कधी कधी काही जण दुसऱ्या राज्यामध्ये देखील अशाप्रकारे लग्न समारंभाची प्लॅनिंग करतात. परंतु प्रत्येक व्यक्तीलाच अशा बाहेरच्या राज्याच्या वेडिंग डेस्टिनेशनच्या ठिकाणी लग्न समारंभ नेणे शक्य नसते. त्यामुळे असेच निसर्गाच्या सानिध्यात असलेले वेडिंग डेस्टिनेशन जर महाराष्ट्रात असतील तर?
हा प्रश्न अनेकांच्या मनात येत असतो. याच अनुषंगाने या लेखांमध्ये आपण महाराष्ट्रातील काही महत्त्वाची वेडिंग डेस्टिनेशन पाहणार आहोत जी अशा लग्न समारंभासाठी खूप आकर्षक आणि कायम आठवणीत राहतील अशी ठरू शकतील.
महाराष्ट्रातील महत्त्वाची वेडिंग डेस्टिनेशन
1- कामशेत– तुम्ही जर महाराष्ट्र मध्ये वेडिंग डेस्टिनेशनच्या शोधात असाल तर कामशेत हे ठिकाण देखील एक चांगले ठिकाण आहे. कामशेत या ठिकाणी सुंदर तलाव असून हिरवीगार अशी मैदानी देखील आहेत. महाराष्ट्रातमध्ये जर वेडिंग डेस्टिनेशनचे प्लॅनिंग असेल तर कामशेत हे एक चांगले ठिकाण आहे.
2- कर्जत– महाराष्ट्रातील वेडिंग डेस्टिनेशन प्लेसेस मध्ये कर्जत हे ठिकाण देखील एक निसर्गरम्य ठिकाण असून या ठिकाणी असलेले निसर्गाचे सौंदर्य तुमचा लग्न समारंभ एक आठवणीतला लग्न समारंभ ठरवू शकते.या ठिकाणी तुम्ही आऊटडोअर आणि इनडोअर समारंभाचे नियोजन करू शकतात.
3- महाबळेश्वर– डेस्टिनेशन वेडिंग करिता सध्या महाबळेश्वरला पसंती दिली जात असून या ठिकाणी असलेले निसर्गसौंदर्य तर सोबतीला आहेच.परंतु लग्न समारंभांकरिता आवश्यक रिसॉर्ट आणि हॉटेल देखील या ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी लग्न समारंभ हा कायम आठवणीत राहील असा ठरू शकतो.
4- रत्नागिरी– रत्नागिरी हे ठिकाण देखील अशा कार्यक्रमांसाठी खूप प्रसिद्ध असून या ठिकाणाला एक ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. रत्नागिरी या ठिकाणी मंदिरे तसेच सुंदर समुद्रकिनारा व इमारती असल्यामुळे पर्यटनाचे केंद्र देखील आहे. या ठिकाणी जर लग्न समारंभाचा विचार केला तर पावस बीच, गणपतीपुळे बीच यासारख्या साइटवर डेस्टिनेशन वेडिंगचा आनंद घेता येऊ शकतो. तसेच लग्नाकरिता रत्नागिरी मध्ये अशी काही निवडक ठिकाणे देखील आहेत.
5- लोणावळा– लोणावळा हे देखील एक निसर्गाने परिपूर्ण नटलेले असे हिल स्टेशन असून मुंबई आणि पुणे या दरम्यान हे वसलेले आहे. लोणावळा हे ठिकाण थंड वातावरणासाठी देखील प्रसिद्ध असून लोणावळा व त्याच्या जवळ असणारे खंडाळा ही दोन्ही ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंगसाठी स्वस्तामध्ये खास परवडणारे आहेत.
6- माळशेज– माळशेज हा परिसर देखील एक निसर्ग सौंदर्याने व्यापलेला परिसर असून डेस्टिनेशन वेडिंगसाठी देखील हे चांगले ठिकाण आहे. या ठिकाणी परवडणाऱ्या दरात आणि चांगल्या पॅकेज मध्ये तुम्हाला हवे त्या प्रमाणात तुम्ही लग्नाची प्लॅनिंग या ठिकाणी आखू शकतात.
7- औरंगाबाद– बरेच जण रात्री लग्न करण्याचा विचार करतात किंवा गोरज मुहूर्तावर लग्न असते. जर तुमचा देखील रात्री लग्न करण्याचा विचार असेल तर औरंगाबाद मध्ये असे अनेक वेडिंग डेस्टिनेशन आहेत जे रात्रीच्या वेळी लग्न करण्यासाठी उत्तम असून या ठिकाणी पार पडलेले लग्न समारंभ आयुष्यभर आठवणीत राहतील अशी ठिकाणी औरंगाबाद मध्ये आहेत.