सत्ता जाताच देवेंद्र फडणवीस यांना आली शनिची आठवण !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्री १० च्या सुमारास शनिशिंगणापूर येथे येऊन शनैश्वराचे दर्शन घेतले. शनिवारी तेलाभिषेकही त्यांनी केला.

हे पण वाचा :- पराभवानंतर माजी आमदार औटी यांनी केले भाषण, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले….

त्यांच्या या दौऱ्याबद्दल फारशी कोणालाही कल्पना नव्हती. सत्तेतून भाजप पायउतार झाल्यानंतर एकाच दिवशी आधी माजी मंत्री एकनाथ खडसे व माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनैश्वराचे मनोभावे दर्शन घेतले.

हे पण वाचा :- पत्रिका नसली, तरी लग्नाला जा…हरिभाऊ बागडे यांचा अहमदनगरच्या भाजप कार्यकर्त्यांना सल्ला !

खडसे यांनी सकाळी ११ वाजता व फडणवीस यांनी रात्री १० च्या सुमारास शनिचरणी हजेरी लावली. फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा शनिशिंगणापुरात केली होती.

हे पण वाचा :- माजी आमदार शिवाजी कर्डिले नाही होणार भाजपचे जिल्हाध्यक्ष !

त्यांच्या कारकिर्दीत शनिशिंगणापूर देवस्थावर सरकारी नियंत्रण आणले गेले. त्यानंतर नव्या विश्वस्त मंडळाची नेमणूक होईल अशी अपेक्षा होती, मात्र ती न झाल्याने सर्वसामान्य भाविकांची निराशा झाली.

हे पण वाचा :- अल्पवयीन मुलीवर घरात बलात्कार ! नातेवाईकांनी दिली मुलीलाच जिवे ठार मारण्याची धमकी …

आता पुन्हा फडणवीस यांनी शनिची आठवण आली. ग्रामस्थांच्या वतीने सरपंच बाळासाहेब बानकर, बाळासाहेब कुऱ्हाट यांनी, तर देवस्थानच्या वतीने योगेश बानकर व आदिनाथ शेटे यांनी फडणवीस यांचा सत्कार केला.

हे पण वाचा :- महिलेला झाले तिच्या ड्रायव्हरवर प्रेम, मुलांसमोरच केला ड्रायव्हरसोबत सेक्स !

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment