अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच हवे त्याबाबत दुमत नाही, असे सांगून ओबीसींच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही.
ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करू, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिला.
तसेच ओबीसी आरक्षणाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हानही त्यांनी दिले. भाजपच्या ओबीसी कार्यकारिणीची रविवारी दादर येथे बैठक झाली त्या वेळी ते बोलत होते.
मराठा समाजाला आरक्षण देताना आम्ही त्यात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का दिला जाणार नाही याबाबतचे कलम टाकले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली, पण या कलमाला स्थगिती नाही.
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. या आरक्षणात कुणालाही वाटेकरी केले जाणार नाही हे स्पष्ट करणारा अध्यादेश राज्य सरकारने काढावा, आगामी काळात ३४६ ओबीसी घटकांचा मेळावा घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com