मुंबई : अजित पवार यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजीनामा दिला आहे.
फडणवीसांनी बहुमत चाचणीतील पराभव टाळण्याऐवजी फडणवीसांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गोपनीयपणे सत्तास्थापनेचा दावा करत 23 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
त्यांच्यासोबत भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या बंडखोर नेते अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त वेळ मुख्यमंत्री (बिगर काँग्रेसी) तसेच सर्वात कमी वेळ मुख्यमंत्री राहण्याचा मान देवेन्द्र फडणवीस यांना मिळाला. दुसऱ्या वेळेस फक्त ७९ तास ते मुख्यमंत्री राहिले. तसेच एका महिन्यात दोनंदा राजीनामा देन्याचाही विक्रम त्यांच्या नवे आहे.