देवेंद्र फडणवीस म्हणतात राज्यात भाजपशिवाय सत्ता येऊच शकत नाही !

Ahmednagarlive24
Published:

मुंबई : राज्यात भाजपशिवाय सत्ता येऊच शकत नाही, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सर्व आमदारांना दिला आहे,

राज्यात भाजपशिवाय कुणाचेही सरकार येऊ शकत नाही. राज्यातील सध्याची परिस्थिती अशीच आहे, असं वक्तव्य भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्याचं सांगण्यात येतं.

भाजपच्या कार्यकारिणीची बैठक आज झाली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना मार्गदर्शन केले.

या बैठकीला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य करतानाच शिवसेनेवरही दोषारोप केले. भाजपच्या सहभागामुळेच मित्रपक्षांना जास्त जागा जिंकता आल्या.

भाजपचे नेते शिवसेनेच्या अनेक मतदारसंघात प्रचारासाठी गेले.या उलट शिवसेनेचा एकही नेता भाजप उमेदवारांच्या मतदारसंघात प्रचारासाठी आला नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

फडणवीस यांनी आमदारांना शेतकऱ्यांच्या बांधावर आणि लोकांमध्ये जाऊन हे ठासून सांगण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती देखील आहे.

सत्ता स्थापनेच्या वेळेस मुंबईत बोलवू, तोपर्यंत जनतेत जाऊन भाजप सरकार येणार हा विश्वास द्या, असेही फडणवीस यांनी सांगितले

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment