अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यापुढील न्यायालयीन अडचणी वाढल्या आहेत. त्याच्याविरुद्ध अँड. सतीश ऊके यांनी दाखल केलेले सर्व खटले नागपूरच्या न्यायालयात दुसरे अति.
मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या विशेष न्यायालयात वर्गीकृत झाले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अपूर्ण आणि खोट्या माहितीचे प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप असणाऱ्या खटल्याची सुनावणीदेखील यातच होणार आहे.
आज (बुधवारी) हा खटला सुनावणीसाठी येणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्रीपदाच्या प्रभावाखाली येऊन निवडणूक निर्णय अधिकारी शेखर घाडगे यांनी पोलीस उपायुक्त विनिता साहू
याच्या मदतीने नियमबाह्य पद्धतीने निवडणूक अर्ज स्वीकारल्याचे सीसीटीव्ही फुटेज हा या खटल्यातील महत्त्वाचा पुरावा असल्याचे सांगण्यात येत आहे.
नागपूरमधील वकील सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात खोटी कागदपत्रे सादर करून निवडणूक अर्ज भरण्याचा खटला दाखल केला होता.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved