आ.संग्राम जगतापांच्या प्रचारार्थ आज धनंजय मुंडेंची नगरमध्ये सभा

Published on -

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस आघाडीचे दक्षिणेचे उमेदवार आमदार संग्राम जगताप व उत्तरेतील उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे हे दोन्ही उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

सकाळी दहा वाजता जुना बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रचार रॅलीस सुरुवात होईल. नगर शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली जाणार असून कलेक्टर कचेरी येथे दोन्ही उमेदवार अर्ज भरणार आहेत.

या वेळी राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता क्लेरा ब्रूस हायस्कूल मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी दिली.

क्लेरा ब्रूस हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार वैभव पिचड, आमदार अरुण जगताप, आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, सत्यजित तांबे, चंद्रशेखर घुले, प्राजक्त तनपुरे, शिवाजी गाडे, आदींसह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe