धनंजय मुंडे झाले भावनिक म्हणाले तुमचे उपकार न फिटणारे आहेत…

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- धनंजय मुंडे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले होते. आरोप करणाऱ्या महिलेने बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर मुंडेना मोठा दिलासा मिळाला आहे.

या नाट्यानंतर पहिल्यांदाच बीड जिल्ह्यामध्ये आलेल्या धनंजय मुंडे नागरीकांनी जंगी स्वागत केले. शिरूर कासार येथे धनंजय मुंडेंवर चक्क जेसीबीने फुलांची उधळण करण्यात आली.

या स्वागताने भारावलेल्या धनंजय मुंडे यांनी सर्वांचे आभार मानले. पुढे बोलताना ते म्हणाले की, माझ्यावर जेव्हा केव्हा कठीण प्रसंग ओढवला तेव्हा तुम्ही लोकांनी मला खंबीरपणे साथ दिली. यावेळी देखील तुम्हीच माझ्या पाठीशी उभे राहिला.

तुमचे उपकार न फिटणारे आहेत, असं म्हणत मुंडे हे भावुक झाले. शिरूर कासार तालुक्यातील खोकरमोहा इथल्या ग्रामसचिवालयाचे उद्घाटन धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले.