सुजय विखेंच्या पत्नीचाही भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- अर्ज दाखल करण्यासाठी अवघे शेवटचे ५ मिनिट शिल्लक असताना भाजपाचे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्री विखे पाटील यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

त्यांच्या अर्जावर संजना चंद्रशेखर कोळसे अनुमोदक व सुचक या आहेत. सौ. धनश्रीताईंनी देखील भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

नगर लोकसभा मतदारसंघात अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवट दिवस होता.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे शेवटचे ५ मिनिट शिल्लक असताना भाजपाचे लोकसभेचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

सुजय विखे यांच्या उमेदवारी अर्जास अडचण आल्यास पर्याय म्हणून धनश्री विखेंनी अर्ज दाखल केल्याचे सांगितले जात आहे.

मात्र सध्या धनश्री विखे यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment