अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत असल्याने जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालये आता पुन्हा एकदा सुरु झाली आहे. कोरोनामुळे गेले अनेक महिन्यांचे रखडलेल्या कामांसाठी नागरिक देखील आता सरकारी कार्यालयांमध्ये गर्दी करू लागले आहे.
मात्र डाऊन सर्व्हरमुळे कामे होण्यास विलंब होत असल्याने सरकारी अधिकारी व नागरिकांमध्ये चांगलेच खटके उडू लागले आहे. नेवासा तालुक्यातील सोनईत सर्व्हरमध्ये येत असलेल्या अडचणींमुळे तलाठ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
या वाढत्या त्रासानंतर डिजिटल सिग्नेचर तहसील कार्यालयात जमा करणार असल्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य तलाठी संघातर्फे तहसीलदारांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे, की डाऊन सर्व्हरमुळे कामे करण्यास अडचण निर्माण होत आहे. नेमके ऑफिस वेळेतच सर्व्हर डाऊन असल्याने शेतकऱ्यांना सात-बारा उतारे देणे शक्य होत नाही, तसेच ई-फेरफारची कामेही प्रलंबित आहेत.
सरकारी कार्यालयांमधून येणारी हि उत्तरे यांना वैतागून शेतकरी व तलाठी यांच्यामध्ये बाचाबाची होत असते. असे निवेदनात म्हटले आहे. यामुळे यावर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.
तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सोपान गायकवाड, तालुकाध्यक्ष अनिल गव्हाणे, सरचिटणीस बद्रिनाथ कमानदार उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved