खा.दिलीप गांधी म्हणतात पाच वर्षात जिल्ह्याच्या विकासासाठी १ लाख कोटींचा निधी आणला !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- नगर जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात गेल्या पाच वर्षात १ लाख कोटींचा निधी आणला, असा दावा भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.

गांधी म्हणाले, भाजपचा खासदार म्हणूनच मी निवडूण आलो.केवळ जैन समाजाचा नाही, तरसर्व समाज, संघटना व जनतेने मला पाठबळ दिले.यापुर्वीही मी हे स्पष्ट केलेले आहे.

मात्र जैन समाजाचा अपमान झाल्याचे सांगत काही जणांचे माझ्यावरचे प्रेम उफाळून आले. पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली.

काही निर्णय राजकीय दुष्टीकोनातून घ्यावे लागतात. पक्षाने ते घेतले.त्यातून डॉ.सुजय विखे यांना उमेदवारी दिली गेली.पक्षाच्या या निर्णयाशी मी सहमत आहे. जे होते ते चांगल्यासाठीच होते.

पत्रकार परिषदेसाठी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, सुवेंद्र गांधी, ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, भैय्या गंधे, किशोर बोरा उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment