अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- दातरंगे मळा येथील एकदंत गणेश मंडळाच्यावतीने दिवाळी व भाऊबीज निमित्त गेल्या 9 वर्षापासून दिपोत्सव साजरा करण्यात येत आहे.
यंदाच्यावर्षीही 1111 दिप लावून आकर्षक रांगोळीची सजावट करण्यात आली होती. एकदंत गणेश मंदिरात श्री गणेशाची महाआरती करुन एकदंत महिला मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते दिप लावण्यात आले.
हा दिपोत्सव पाहण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. दरवर्षी विविध सामाजिक विषयांवर दिपोत्सव साजरा करुन या माध्यमातून समाजामध्ये एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येत असतो.
यापूर्वी ‘मतदान जागृती’, ‘मोबाईल यंत्र कि जीवन..?’ आदि विषयावर दिपोत्सव साजरा करण्यात आला होता. मंडळाच्यावतीने वृक्षारोपन, अन्नदान,
आरोग्य शिबीर, रक्तदान आदि उपक्रम वर्षभर राबविण्यात येत असतात. कोरोनाच्या काळातही गरजूंना चांगल्या प्रमाणात मदत केली. त्यांच्या उपक्रमांचे विविध स्तरातून कौतुक होत असते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reservedpp