अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- नगर-बीड-परळी बैजनाथ या नवीन रेल्वे मार्गासाठी 29 कोटी 30 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यास गृह विभागाने मान्यता दिली आहे. 2020-21 साठी 149.50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
राज्य शासनाने 31 मार्च 2020 पर्यंत 1169.84 कोटींचा निधी दिलेला आहे. आता 2020-21 साठी रेल्वेने केलेल्या मागणीनुसार 29.30 कोटींचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या रेल्वेमार्गासाठी 2826 कोटी रुपयांचा खर्च अंदाजित असून या खर्चापैकी 1413 कोटी एवढा 50 टक्के हिसा राज्य शासनाकडून केंद्रीय रेल्वे बोर्डास उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या मार्गासाठी 31 मार्च 2020 पर्यंत 1398.12 कोटी इतका निधी उपलब्ध करून दिला आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये