डॉक्टरची IDEA : कोरोना टाळण्यासाठी बनवले असे यंत्र ज्याने स्पर्श न करता हात धुता येतात !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 :- नगर तालुक्यातील वाळकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल ससाणे यांनी कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी रुग्णालयात येणार्‍या रुग्णांसाठी व कर्मचार्‍यांच्या आरोग्याच्या दृष्टिने सुरक्षितेसाठी विशेष यंत्रणा बनवली आहे.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हँडवॉश, सॅनिटायझर किंवा नळाच्या पाण्यानं हात स्वच्छ करतो. पण त्यासाठी हँडवॉश, सॅनिटायझरची बाटली आणि नळाला हात लावतो. त्यामुळं संसर्ग होण्याची भीती असते.

नगर तालुक्यातील वाळकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यानं उपाय शोधला आहे. त्यांनी एक यंत्रणा तयार केली आहे. हॅण्डवॉश, नळाला हात लावण्याची गरजच नाही.

हात स्वच्छ करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यानं फुट ऑपरेटिव्ह हॅंडवॉश आणि सॅनिटायझर यंत्रणा तयार केली आहे. सध्या आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि केंद्रात येणारे रुग्ण या यंत्रणेचा वापर करत आहेत.

कोरोनाचा विषाणूचा वाढत असलेला फैलाव रोखण्यासाठी आरोग्य केंद्राचे अधिकारी, कर्मचारी परिसरातील गावांमध्ये जबाबदारीने आपले काम चोखपणे बजावत आहेत.

कोरोना आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी आपण कशा पध्दतीने आरोग्याबाबत काळजी घ्यावी याबाबतची माहिती जनतेला गावोगावी जाऊन देत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment