रक्तदान करा अन् मोफत मिळवा एक 1 किलो चिकन !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-राज्यात कोरोनाच्या काळात रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई जाणवत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असं आवाहन केले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात चक्क रक्तदानासाठी आगळीवेगळी ऑफर ठेवण्यात आली आहे.

या ऑफरमुळे रक्तदान करण्याकरीता नागरिक नक्कीच पुढे येतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. प्रत्येक रक्तदात्यास एक किलो चिकन मोफत देण्यात येईल. तर, शाकाहारी रक्तदात्यांना पनीर देण्यात येईल. अशी ऑफर नगरसेवक आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य समाधान सदा सरवणकर यांनी दिली आहे.

आदित्य ठाकरे यांचा मतदार संघ माहिम-वरळी विधानसभा क्षेत्रातील राजाभाऊ साळवी मैदान, न्यू प्रभादेवी रोड, मुंबई येथे येत्या 13 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत महा रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. नगरदेवक समाधान सदा सरवणकर हे या रक्तदान शिबीराचे आयोजक आहेत.

कोविडच्या या संकटात रक्तदान करू लोकांचे प्राण वाचवू या मथळ्याखाली एक जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘फ्री चिकन ब्लड डोनर’ असं म्हणत प्रत्येक रक्तदात्यास 1 किलो चिकन देण्यात येईल (शाकाहारी रक्तदात्यांना पनीर देण्यात येईल.) अशी ऑफर देण्यात आली आहे.

या रक्तदान शिबीरासाठी पूर्व नोंदणी 11 डिसेंबरपूर्वी शिवसेना शाखा 194, सामना प्रेस शेजारी करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News