लाॅकडाऊनच्या निर्णयाने भयभीत होवू नका, आपत्तीला धैर्याने सामोरे जावू- आ.विखे पाटील

Ahmednagarlive24
Published:
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना या जागतिक आपतीची वाढती व्याप्ती लक्षात घेवून राज्य सरकरने  महाराष्ट्र  लाॅकडाऊन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाने भयभीत होवू नका.सरकार प्रशासन आणि जनतेच्या   सहकार्यानेच  या राष्ट्रीय आपतीचा धैर्याने मुकाबला करण्यासाठी जागृकता दाखवावी असे आवाहन माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूच्या केलेल्या आवाहानाला सर्वच समाज घटकांनी सकारात्मक प्रतिसाद देवून हा जनता कर्फ्यू यशस्वी केल्याबद्दल जनतेचे आभार मानले. आ.विखे पाटील म्हणाले की,असेच सहकार्य पुढील काही दिवसही मिळावे आशी  अपेक्षा आहे.
या जागतिक आपतीचे संकट निवारण्यासाठी सर्वाच्या मदतीची व सहभागाची  गरज लागणार  आहे.राज्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहाता या आपतीला रोखण्याचे मोठे आव्हान  आपल्या सर्वाच्या समोर असल्यानेच याबाबत प्रशासकीय स्तरावर  होणाऱ्या सर्वच निर्णयांना सहकार्य करण्याबाबत त्यांनी सूचित केले.
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात लाॅकडाऊन जाहीर केल्याने जनतेने पुढील काही दिवसात आशाच संयमाने शांततेने आणि सामाजिक बांधिलकीने प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे हे संकट मोठे असले तरी धैर्याने त्याचा मुकाबला करावा लागेल असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान आजच्या जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर आ.विखे पाटील यांनी मतदार संघाबरोबरच जिल्ह्य़ातील पदाधिकारी कार्यकर्त्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून वेळोवेळी आढावा घेतला.जिल्हा प्रशासनाशी संपर्क ठेवून जिल्ह्य़ातील परिस्थितीची माहीती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहानाला प्रतिसाद म्हणून आ.विखे यांनीही कुटूबियां समवेत टाळ्या वाजवून आणि घंटानाद  करून  या आपतीच्या काळात सेवा येणाऱ्या व्यक्तिविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनी विखे पाटील रणरागिणी महीला मंचाच्या अध्यक्षा सौ.धनश्री विखे पाटील यांच्यासह कुटूबिंय याप्रसंगी उपस्थित होते.गावपातळीवर सामान्य माणसांच्या अत्यावश्यक सुविधेकरीता आ.विखे पाटील यांनी स्थानिक प्रशासनासह संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना तत्पर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कोरोना व्हायरसचा विळखा रोखण्यासाठी राज्य सरकारने पुढील काही दिवसांकरीता घेतलेल्या कठोर निर्णयांची अंमलबजावणी सर्वानाच करावी लागेल यासाठी सर्वच समाज घटकांनी स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे,आरोग्य सुविधेकरीता सरकारी यंत्रणांशी संपर्क साधावा अत्यावश्यक सेवा उपलब्ध होणार असल्याने जनतेने भयभीत होवू नये असेही विखे पाटील यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment