अहमदनगर लाईव्ह 24 टीम / निघोज: पारनेर -नगर मतदारसंघातील प्रत्येक गावाने गावातील स्थानिक राजकारण बाजूला ठेवून गावच्या विकासासाठी एकत्र आल्यास राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी मिळवून देण्यासाठी मी सदैव तत्पर राहील.
मात्र, यासाठी गावातील गटातटाचे राज़कारण बाज़ूला ठेवून विकास कामांसाठी एकत्र यावे, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.
पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळनेर येथे प्रयत्न शिक्षण संस्थेच्या संत निळोबाराय विद्यालयाच्या इमारत कामाच्या भूमिपूजनप्रसंगी आ. लंके बोलत होते.
अध्यक्षस्थानी जयसिंग मापारी होते. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या वेळी संस्थापक भास्करराव रासकर अशोक सावंत, सरपंच शीतल रासकर, मा. सरपंच अनुराधा रासकर, मा. सरपंच राजेंद्र रासकर, उपसरपंच एम. बी. रासकर, रघुनाथ रासकर, लक्ष्मण खामकर, विठ्ठल बुवा मकाशिर, पांडुरंग सातपुते, उपसभापती, महेश रासकर, सुदाम पवार, सुभाष गाजरे, उद्योजक मनसुखलाल गुगळे, भाऊसाहेब लटांबळे, तुळशिराम कळसकर, विजूशेठ गुगळे, मुख्याध्यापक भालेराव सर, भोंगसर, शिर्केसर, शिंगाडे सर ,संजय सातपुते, सौ. पाटील मॅडम, वाळुंज मॅडम, मंदा रासकर, आजी -माजी विद्यार्थी, शिक्षक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.