डॉ. श्रीकांत जिचकार यांचा धडा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करा! – आ. सत्यजीत तांबेंनी शिक्षणमंत्र्यांकडे केली मागणी

Ahmednagarlive24
Published:

Maharashtra News : देशातील सर्वाधिक शिकलेले व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. श्रीकांत जिचकार यांची ओळख आहे. जिचकार यांच्या जीवनपटावरील धडा महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करावा,

अशी मागणी आमदार सत्यजीत तांबेंनी जयहिंद लोकचळवळीच्यावतीने शालेय शिक्षणमंत्री डॉ. दीपक केसरकर यांच्याकडे केली. डॉ. श्रीकांत जिचकार यांच्याकडे डॉक्टर, वकील, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानसशास्त्र यांसारख्या वीसपेक्षा अधिक पदव्या आहेत.

डॉ. श्रीकांत जिचकार यांचा धडा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश होण्यासाठी जयहिंद लोकचळवळीच्यावतीने स्वाक्षरी मोहीम देखील राबविण्यात आली होती. या स्वाक्षरी मोहिमेत एक लाखाहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता.

देशात सर्वात जास्त शिकलेला नेता म्हणून डॉ. श्रीकांत यांची ओळख आहे. आतापर्यंत त्यांचा हा विक्रम कोणीही मोडू शकलेले नाही. त्यांना भारतातील सर्वात जास्त शिक्षित व्यक्ती देखील म्हटले जाते.

लिम्का बुकमध्ये ही त्यांच्या नावाचा उल्लेख भारतातील सर्वात जास्त शिकलेली व्यक्ती म्हणून आहे. ४२ विद्यापीठात शिकले असून २० पेक्षा जास्त पदव्या त्यांच्याकडे आहेत.

जिचकार वयाच्या २६ व्या वर्षी देशातील सर्वात तरुण आमदार होण्याचा मानही त्यांनी मिळवला होता. ते महाराष्ट्राचे शक्तिशाली मंत्रीही म्हणून देखील त्यांनी काम केली.

पुढे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि राज्यसभेवरही खासदार म्हणून काम पार पाडले. युनेस्कोमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते, अशी माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली.

जिचकार यांच्या कार्याची माहिती प्रत्येक विद्यार्थ्यांना माहित हवी!

शिक्षणमंत्री जनभावना लक्षात घेऊन सकारात्मक निर्णय घेतील. डॉ. श्रीकांत जिचकार यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याची माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांला व्हावी, यासाठी जयहिंद लोकचळवळच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. – आमदार, सत्यजीत तांबे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe