लोणी : सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा जयंती दिन हा शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्याच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, विकास व मत्सव्यवसाय विभागाने घेतला आहे.
डॉ. विखे पाटील यांनी शेतकऱ्यांकरीता केलेल्या कार्याचे स्मरण व्हावे व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान म्हणुन नारळी पौर्णिमेच्या दिवशी असलेला त्यांचा जन्मदिवस हा शेतकरी दिन म्हणुन साजरा केला जातो.
राज्यसरकारने १४ ऑगस्ट २०१४ रोजी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा तिथीप्रमाणे येणारा जन्मदिवस हा शेतकरी दिन म्हणुन साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार दरवर्षी शासनाच्या वतीने कृषि व पशुसंवर्धन विभाग हा शेतकरी दिन सर्वत्र साजरा होण्याच्या दृष्टीने निर्देश निर्गमित करीत असते.
यावर्षी संबंधित विभागाने १४ ऑगस्ट २०१९ रोजी पद्मश्रीचा जयंतीदिन तिथीप्रमाणे शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. शेतकरी दिनाच्या निमित्ताने शेतकरी मेळावे व कृषि क्षेत्रासंदर्भात मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करुन, शेतकऱ्यांचा सन्मान करण्याबाबत कृषि विभागाने काढलेल्या परिपत्रकात सूचित केलेले आहे.
- नेप्ती उपबाजार समितीच्या ७ एकर जागेमधून मुरुम उत्खनन करणाऱ्या टोळीवर कारवाई करा – अमोल येवले
- महापालिकेने पाणीपट्टी दारात केलेली वाढ त्वरित रद्द करावी – आ.संग्राम जगताप
- पुणे-सोलापूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ ठिकाणी तयार होणार तीन नवे उड्डाणपूल
- बिल देण्याच्या कारणावरून साकूरमध्ये हाणामारी ; १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, सकल हिंदू समाजाचे गावबंद आंदोलन
- ‘आध्यात्मिक शक्तीपीठ म्हणून भगवानगडाची ओळख’ ; भगवान गडावर भाविकांची अलोट गर्दी