रिक्षाने दुचाकीला धडक दिल्याने चालक ठार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- रिक्षाने दुचाकीला धडक दिल्याने त्यावरील चालक ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी फिर्याद देण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळासाहेब धोंडीराम घोडके (रा. सम्राटनगर, दत्तनगर, श्रीरामपूर) हे आपल्या ॲक्टिव्हा दुचाकीवरून श्रीरामपूरहून बाभळेश्वरच्या दिशेने चालले होते.

नांदूर गावच्या शिवारातील ग्रामपंचायतीच्या विहिरीजवळील कॉर्नरला समोरून येणाऱ्या ॲपे रिक्षाने त्यांना जोराची धडक दिली. यात घोडके ठार झाले.

यावेळी रिक्षातील वैभव विश्वास शेलार (रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर), अलका गोरख गांगुर्डे (रा. वॉर्ड क्र. २, श्रीरामपूर) हे जखमी झाले.

याप्रकरणी मयत घोडके यांच्या पत्नी शीतल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment