अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी :- नाताळ सुट्यांमुळे शिर्डीत भाविकांच्या गर्दीत वाढ झाली असून साईनगरी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे. दर्शनरांग व मंदिर परिसरात भाविकांची मांदियाळी दिसत आहे.
नाताळ सुटी व नवीन वर्षाचे स्वागत यानिमित्ताने ही गर्दी ५ जानेवारीपर्यंत राहील असे चित्र आहे. सूर्यग्रहणामुळे गुरुवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत साईमंदिर बंद राहणार आहे.
त्यानंतर भाविकांना नेहमीप्रमाणे दर्शनाचा लाभ घेता येईल, असे कळवण्यात आले आहे. सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणारी गर्दी लक्षात घेता ३१ डिसेंबरला साईमंदिर रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे.