लॉकडाऊनच्या काळात शिर्डी देवस्थानच्या देणगीत दिवसाला ‘एवढी’ घट

Published on -

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :-  लॉकडाऊनच्या काळात शिर्डीच्या साईसंस्थानला मिळणाऱ्या देणगीत दिवसाला तब्बल पावणेदोन कोटी रुपयांची घट झाली आहे. सध्या ऑनलाईनच्या माध्यमातून रोज सरासरी चार लाख रुपयांची देणगी मिळत आहे.

साईसंस्थानला कोरोनाने आर्थिक संकटात टाकले आहे. संस्थानचे वर्षाचे उत्पन्न सरासरी ६८० कोटी तर खर्च ६०० कोटी आहे. मे अखेर संस्थानच्या देणगीत सव्वाशे कोटी रुपयांची घट झाली आहे.

साईसंस्थानकडे कायम व कंत्राटीसह जवळपास सहा हजार कर्मचारी आहेत. वर्षाला पगार आणि बोनसपोटी संस्थानचे १८७ कोटी तर दिवसाला ५० लाख रूपये खर्च होतात.

संस्थान प्रसादालयात मोफत अन्नदान करते. यावर वर्षाला ४० कोटींचा खर्च होतो. संस्थानचे दोनपैकी एक रूग्णालय पूर्णपणे मोफत आहे. गेल्या वर्षी या रूग्णालयातून ४८ कोटींचे उत्पन्न मिळाले, तर १२० कोटी रुपये खर्च झाले.

दुर्धर आजारासाठी गेल्या वर्षभरात ७१४ गरीब रूग्णांना तब्बल सतरा कोटी रूपये मदत पाठविण्यात आली . संस्थानच्या शैक्षणिक संकुलात पाच हजारांवर विद्यार्थी आहेत.

मुलींना मोफत शिक्षण आहे . संस्थानचे शिक्षणावर १४ कोटी खर्च होतात. उत्पन्नात घट झाल्याने शिर्डी देवस्थान ट्रस्टसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. यातून विश्वस्त मंडळ नेमके कसा मार्ग काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe