पून्हा एकदा एकनाथ खडसे यांचे राजकीय भवितव्य अडचणीत ?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठविली आहे. बीएचआर संस्थेतील घोटाळ्याची कागदपत्रे सादर केल्यानंतर खडसेंना ही नोटीस आल्याचे समजते.

या वृत्तामुळे राजकीय वतुळात खळबळ उडाली आहे. एका भूखंड घोटाळ्यावरून एकनाथ खडसे यांनी सहा वर्षांचा राजकीय वनवास भोगला होता.

त्यानंतर आता पून्हा एकदा त्यांना ईडीची नोटीस आल्याचे वृत्त आहे. खडसे पून्हा एकदा घोटाळ्यात त्यांचे राजकीय भवितव्य अडचणीत येवू शकते.

ईडीने खडसेंना पाठविलेल्या नोटीसमध्ये ३० डिसेंबरला हजर राहण्याची आदेश दिले आहेत. अद्याप नोटीस मिळाली नाही, नोटीस मिळाल्यावर बोलेन, अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली आहे.

ही नोटीस नेमकी कशासंदर्भात आहे? देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या क्लिनचिटचा पुण्यातील भूखंड घोटाळा की आणखी कशाबाबत हे अद्याप समजू शकलेले नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe