३१ मार्चपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हा; अनिल परब यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

Published on -

मुंबई : परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे (S.T. Corporation) अध्यक्ष ॲड. अनिल परब (Anil Parab) यांनी सभागृहात एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले आहे.

परब यांनी ३१ मार्चपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हा असे सांगत कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचारी (Employees) कामावर आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांबाबत चर्चा केली जाईल असे ते म्हणाले आहेत.

तसेच ते म्हणाले, कामगार वेगवेगळया आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत, तसेच कामगारांच्या भावनेचा उद्रेक होऊ देऊ नका. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्यास कोणीही बंदी घातलेली नाही. असेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, यांनी आज दोन्ही सभागृहात निवेदन केले आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्य सरकारने (State Government) वेळोवेळी बैठका घेऊन संपाची दखल घेत कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

त्यामुळे, संपामुळे जेष्ठ नागरिक, सर्वसामान्य प्रवाशी यांच्याबरोबरच शाळकरी विद्यार्थी यांना नाहक त्रास होत आहे. सध्या मुलांच्या परीक्षा (Exam) सुरु आहेत अशा विद्यार्थांची गैरसोय होऊ नये यासाठी शाळांच्या मार्गावर जास्त गाड्या सुरु करण्यात येतील, अशी माहितीही मंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली.

एसटी संपाबाबत मंत्री ॲड. परब यांनी केलेल्या निवेदनावर विधान परिषद सदस्य जयंत पाटील (Jayant Patil), सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्यासह अनेक सदस्यांनी समाधान व्यक्त करत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्याचे आवाहन केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe