अहमदनगर ब्रेकिंग : मायलेकीने विहिरीत उडी घेत संपविले जीवन !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- धनगरवाडी (ता. नगर) येथे मायलेकीची विहिरीत उडी घेऊन, आत्महत्या केल्याची घटना घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना कशामुळे घडली, हे अद्यापही कळू शकलेले नाही.

नीता उर्फ कविता सचिन कापडे (वय- २७) व मुलगी प्रणाली (वय- ४) यांनी विहिरीत उडी घेऊन, आत्महत्या केली. गुरुवारी (दि.२८) रात्री नीता कापडे व मुलगी प्रणाली यांनी स्वतःच्या घराला कडी लावून घराबाहेर पडल्या.

सकाळी घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर दोघी मायलेकी निदर्शनास आल्या नाही. त्यानंतर घरच्यांनी शोधाशोध केली असता, जवळच पाचशे मीटर अंतरावर असलेल्या एक विहिरीमध्ये दोघींचे मृतदेह आढळून आले.

त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शविच्छेदन तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दीपक गांगर्डे हे तपास करत आहेत.

Entertainment News Updates 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment