पुजा साहित्याला बंदी असतानाही भाविकांच्या हातात पुजेचे ताट

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्यभरात गेले अनेक महिने धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. मात्र अखेरीस महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेत व भाविकांची श्रद्धा लक्षात घेत धार्मिक स्थळे खुली करण्याचे जाहीर केले.

त्यानुसार कालपासून सर्व धार्मिक स्थळे उघडण्यात आले आहे. त्यातच जगप्रसिद्ध असलेलं सोनई येथील शनिशिंगणापूर हे देवस्थान अनके दिवसांनी खुले झाल्यानंतर भाविकांची दर्शनासाठी एकच झुंबड उडाली होती.

यावेळी याही धार्मिक स्थळावर नागरिकांकडून शासनाच्या नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसून आले आहे. राज्य सरकारच्या परवानगीनंतर सोमवारी पाडव्याच्या दिवशी पहाटे साडेचारच्या आरती सोहळ्यानंतर स्वयंभू शनिमुर्तीचे दर्शन खुले करण्यात आले.

सोमवारी पहाटे साडेचार वाजता ‘सुर्यपुत्र शनिदेव की जय’च्या जयघोषात महंत त्रिंबक महाराज यांच्या हस्ते आरती सोहळा झाला. यावेळी मोजकेच ग्रामस्थ उपस्थित होते.

आरती सोहळ्यानंतर महाद्वार समोरील संरक्षण कठडे काढून भाविकांना प्रवेश देण्यात आला. मंदिर खुले केल्यानंतर पहिल्याच दिवशी दिवसभरात साडेतीन हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

यावेळी मंदीर प्रशासनाने महाद्वारात हात-पाय धुण्याची व्यवस्था केली. चौथ-यापर्यंत पुजा साहित्याला बंदी असतानाही भाविकांच्या हातात पुजेचे ताट दिसत होते.

सायंकाळी झालेल्या आरतीला सुरक्षित अंतर ठेवून शंभर भाविक उपस्थित होते.सर्वांनी चौथ-या खालुनच दर्शन घेतले असल्याची माहिती मिळते आहे.

दरम्यान भाविकांनी दर्शनासाठी येण्यापूर्वी शासनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment