धरणे भरली तरी नगरकरांचा घसा कोरडाच

Published on -

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाने चांगलीच हजेरी लावली. यामुळे अल्पवधीतच जिल्ह्यातील धरणे, बंधारे, तलाव, नद्या या ओव्हरफ्लो झाल्या.

पाण्याची मुबलकता पाहून यंदाच्या वर्षी दुष्काळाची झळ बसणार नाही, अशी अपॆक्षा ठेवणाऱ्या नगर शहरातील काही भागांमध्ये पाणी टंचाईची समस्यां गंभीर बनत चालली आहे. शहरातील भिंगारमध्ये अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या आहे.

हा प्रश्‍न सोडविण्याची मागणी भिंगारकरांनी मनपाकडे केली आहे. मुळा धरणात पाणी मुबलक असले तरी शहरालाच पाण्याची टंचाई भासत आहे.

शहराला जीवनदायी ठरणारी अमृत योजना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर नगर शहराला मुबलक पाणीपुरवठा झाल्यानंतर शिल्लक राहणारे पाणी भिंगार शहराला देता येईल,

यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिले. भिंगारचा पाणी प्रश्नाबाबत भिंगार भाजपच्यावतीने महापौर व आयुक्त यांना निवेदन देण्यात आले होते.

त्यानुसार आज महापौरांच्या उपस्थितीत आज बैठक घेण्यात आली. यावेळी छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी भिंगारच्या छावणी परिषदेच्या पाणी पुरवठ्याची माहिती देऊन

शहराला एमएएसकडून व्यवसायिक दराने पाणीपुरवठा होत आहे. मात्र, हे पाणी कायम विस्कळीत असल्याने भिंगारच्या नागरिकांना चार-पाच दिवस पाणीपुरवठा होत नाही.

मनपाने जर भिंगारला पाणी दिले तर पाईपलाईनचा खर्च छावणी परिषद करेल, असे सांगितले. दरम्यान मनपा आयुक्तांनी मनपा अभियंतांकडून तांत्रिक बाबी समजून घेतल्या.

शहराच्या पाणीपुरवठ्यात कोणताही परिणाम न करता मनपाला भिंगारला पाणीपुरवठा करता येईल का याबाबत अहवाल द्यावा, अशा सूचना केल्या.

नगरसेविका शुभांगी साठे यांनी भिंगार शहराला मनपाच्या माध्यमातून पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी काही दिवसांपूर्वी महापौर व आयुक्तांना केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe