अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचा मुलगा अाणि शिवसेना विभागप्रमुख दीपक मारटकर (३२, रा. गवळी अळी, पुणे) यांचा शुक्रवारी मध्यरात्री बुधवार पेठेत धारदार शस्त्राने एका टाेळक्याने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली.
राजकीय पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आली असून याप्रकरणी फरासखाना पाेलिस ठाण्यात सात अाराेपींसह एका महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
दरम्यान, शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पाेलिसांची भेट घेत या गुन्ह्यातील अाराेपींवर माेक्कानुसार कारवाई करण्याची मागणी केली अाहे.
शुक्रवारी मध्यरात्री ते घराजवळ गवळी अळी येथे मित्रासाेबत थांबले हाेते. त्याच वेळी दुचाकीवरून अालेल्या चार ते पाच जणांच्या टाेळक्याने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved