अहमदनगर :- शिवसेनेचे उपनेते, नगरचे माजी आमदार अनिल राठोड यांचा राज्याच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याचे वृत्त नगर स्वंतत्र या दैनिकाने दिले आहे.
या वृत्तात सांगितले आहे कि, राठोड हे सलग चार वेळा नगर शहरातून निवडून आले आहेत. मातोश्री वरून राठोड यांच्या नावाचाही विचार सुरू झाला असून, त्यांच्या समावेशास कोणतीही अडचण नसल्याचे समोर येत आहे.

गेल्या तीन – चार दिवसांपासून राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे वारे वाहत आहेत. याबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला असता, राठोड यांच्या नावाचा विचार सुरू असल्याचे सांगितले.
- महाराष्ट्र राज्य शासनाचा डोळे दिपवणारा मेगाप्रोजेक्ट ! राज्यात तयार होणार नवा सहापदरी मार्ग, 5 तासांचा प्रवास फक्त दीड तासात
- नवीन वर्षाआधीच महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना मिळाली मोठी भेट ! ‘या’ शहरातील दोन महत्त्वाची रेल्वे स्थानके प्रवाशांच्या सेवेत दाखल
- आठव्या वेतन आयोगात पेन्शन धारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार नाही का? सरकारने स्पष्टचं सांगितलं
- फडणवीस सरकारचा लाडकी बहिण योजनेबाबत आणखी एक मास्टरस्ट्रोक ! महायुती सरकारचा नवा निर्णय पहा…
- मोठी बातमी ! पुण्यातील ‘हा’ भाग सुद्धा आता मेट्रोच्या नकाशावर येणार, CM फडणवीसांची मोठी घोषणा













