खळबळजनक! धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत नातेवाईक असलेल्या तरुणीने पोलिसांत धाव घेतली आहे.

ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज एका महिलेने दिला असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी सांगितले आहे.

धनंजय मुंडे यांनी माझ्यावर अत्याचार केला असल्याची माहिती सदर महिने तिच्या ट्वीटर अकाऊंट वरून केला आहे. मात्र, सदर घटनेची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली नसल्याचेही तिने म्हटलं आहे.

दरम्यान सदर महिलेने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देखील ट्वीट केले आहे. त्याचबरोबर देशाचे पंतप्राधान नरेंद्र मोदी यांनाही ट्वीट केले आहे.

मुंबई पोलीस, मुंबई पोलीस आयुक्त, सुप्रिया सुळे, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्वीटमध्ये टॅग करत मदत करण्याची विनंती देखील केली आहे.

याबाबत मुंबई पोलीस अधिक तपास करत आहे. १० तारखेला याबाबतची तक्रार दिली. ११ तारखेला मुंबई पोलिसांकडून अर्ज स्विकारण्यात आला आहे.

२००६ पासून अत्याचार सुरु होते. पुढे बॉलीवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. तसेच याचे व्हिडीओ काढून धमकावल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment