अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार आता दिवाळी व छठ पुजेपर्यंत म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत केला जाणार आहे.
गरीब कल्याण योजना दिवाळीपर्यंत सुरु राहणार असल्याची मोठी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली. देशातील एकही व्यक्ती उपाशी राहिला नाही पाहिजे.असे मोदी म्हणाले.
देशाच्या 80 कोटी नागरिकांना दिवाळीपर्यंत मोफत धान्य दिलं जाणार असून, दर महिन्याला पाच किलो गहू किंवा पाच किलो तांदूळ मोफत दिले जातील, सोबतच प्रत्येक परिवाराला दर महिन्याला एक किलो डाळ मोफत दिली जाणार आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या विस्तारात 90 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च होणार आहे.यामध्ये मागील तीन महिन्यांचा खर्च जोडला तर हा खर्च दीड लाख कोटींच्या घरात जातो.
आता संपूर्ण भारतासाठी एक रेशनकार्डचीही व्यवस्था केली जात आहे. म्हणजेच वन नेशन वन रेशनकार्ड असणार आहे. वन नेशन वन रेशन कार्डचा सर्वात मोठा फायदा गरीब लोकांना होईल, जे पोटापाण्यासाठी आपलं गाव सोडून इतरत्र नोकरीसाठी जातात.
मान्सून काळात कृषी क्षेत्रात अधिक काम असतं. तसंच सणासुदीच्या काळात पैसे लागतात. म्हणून दिवाळी आणि छटपूजेपर्यंत म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत या योजनेची मुदत वाढवण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews