शरद पवारांच्या ताफ्यातील वाहनाचा एक्स्प्रेस वेवर अपघात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा मुंबईच्या दिशेने जात असताना या ताफ्यातील पोलीस पायलेटिंग मोटार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाच्या खाली पलटली.

शरद पवार यांच्या वाहनाचा ताफा आज सकाळी मुंबईच्या दिशेने जात असताना ताफ्यात मागे असलेली पोलीस व्हॅन क्र. (एमएच 12 एनयु 5881) च्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्यात पलटी झाली.

सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र दोन जण जखमी झाले आहेत.सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

अमृतांजन पुलाजवळ शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांची गाडी घसरल्याने उलटी झाली.खंडाळा बोगदा सोडल्यानंतर तीव्र उतारामुळे वेगावर नियंत्रण राखता न आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मोटार कठड्यास धडकत उलटली.

शरद पवारांची गाडी पुढे होती. त्यामुळे त्यांच्या गाडीला धक्का न लागल्याने सुरक्षित आहे.या अपघातात पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. तर शरद पवार सुखरुप असून ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

पाठीमागील गाडी उलटल्याचे लक्षात आल्यानंतर शरद पवार यांनी गाडी थांबवून अपघातात जखमी झालेल्यांची विचारपूस केली. उपचारासाठी त्यांना हॉस्पीटलमध्ये पाठवण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment