अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज नगरमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
हे पण वाचा :- पराभवानंतर माजी आमदार औटी यांनी केले भाषण, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले….
फडणवीस महाविकास आघाडीच्या सरकारबाबत करत असलेल्या विविध विधानाचा थोरात यांनी समाचार घेतला. फडणवीस यांना चांगल्या भविष्यकाराची गरज असल्याची बोचरी टीका थोरात यांनी केली आहे.
हे पण वाचा :- पत्रिका नसली, तरी लग्नाला जा…हरिभाऊ बागडे यांचा अहमदनगरच्या भाजप कार्यकर्त्यांना सल्ला !
माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे औरंगाबादला जात असताना नगरच्या शासकीय विश्रामगृहावर थांबले होते.
हे पण वाचा :- माजी आमदार शिवाजी कर्डिले नाही होणार भाजपचे जिल्हाध्यक्ष !
नगर शहर भाजपच्या वतीने त्यांचे स्वागत शहराध्यक्ष दिलीप गांधी यांनी केले. आ. बबनराव पाचपुते, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, सुनिल रामदासी, किशोर बोरा, वसंत राठोड आदी उपस्थित होते.
हे पण वाचा :- अल्पवयीन मुलीवर घरात बलात्कार ! नातेवाईकांनी दिली मुलीलाच जिवे ठार मारण्याची धमकी …
फडणवीस यांनी यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलण्यास नकार दिला. शहर भाजपतर्फे सत्कार स्वीकारताना काही क्षणात ते पुढील प्रवासासाठी औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले.
हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : आमदार निलेश लंकेंच्या गावात तरुणाचा खून
दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी काल मुलाखती झाल्या. जिल्हाध्यक्षपदाचा निवडीचा चेंडू प्रदेशच्या कोर्टात आहे. याबाबत फडणवीस काही सूचक विधान करतील, असे भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत होते.
हे पण वाचा :- महिलेला झाले तिच्या ड्रायव्हरवर प्रेम, मुलांसमोरच केला ड्रायव्हरसोबत सेक्स !
परंतु फडणवीस यांनी सूचक मौन पाळले. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये फडणवीस यांच्या मौनबाबत संभ्रमाचे आणि गोंधळाचे वातावरण आहे.