‘फडणवीसांनी सुशांत आत्महत्या प्रकरणात राजकारण केले, हा घ्या पुरावा…’

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणात अनेक वळणे आली. रोज नवनवीन स्टेटमेंट या प्रकरणात केली जात आहेत.

यात राजकारणही तापू लागले आहे. माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी याबाबत चांगलेच रण पेटवले होते. आघाडीसरकावर आरोप करत हा तपस सीबीआयकडे द्यावा अशी मागणी त्यांनीकेली होती.

परंतु आता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी फडणवीसांवर घणाघात केला आहे. देवेंद्र फडणवीस यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी म्हणून नियुक्ती केले जाणार आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

याबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले की, ‘सुशांत सिंह राजपूत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती आणि आता त्यांना प्रभारीपद दिले जात आहे, हे सर्व पाहता या प्रकरणात राजकारणच आहे,

अशी प्रतिक्रिया आमच्या सर्व नेते मंडळींनी दिली आहे. माझेही तेच मत आहे. पाच वर्षे ज्यांनी स्वतः गृहखाते सांभाळले तेच पोलिसांवर संशय व्यक्त करतात ही दुर्दैवी गोष्ट आहे,’

असा टोलाही त्यांनी लगावला.आज नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment