अहमदनगर लाईव्ह 24 टीम / औरंगाबाद: मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्नासाठी भाजपाच्यावतीनं माजी मंत्री पंकजा मुंडे आज, सोमवारी उपोषण करणार आहेत. सकाळी दहा वाजता औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंकजा मुंडे उपोषणाला सुरुवात करतील.
या उपोषणामध्ये देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावरुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी मराठवाडा पाणी प्रश्नी आंदोलन छेडण्याचे संकेत दिले होते.
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नी लढा उभारणाऱ्या पंकजा मुंडे यांना पाठिंबा देण्यासाठी औरंगाबादला येण्याचं आवाहन भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं. प्रीतम मुंडेंनी गेल्या आठवड्यात फेसबुक पोस्ट लिहून कार्यकर्त्यांना साद घातली होती.