अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संपत्तीच्या वादामुळे वडीलांनीच आपल्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यात घडली आहे.
संपत्तीच्या वादातून हातात शस्त्र घेऊन पित्यावरच हल्ला करण्यास निघालेल्या पुत्रावर बंदुकीतून गोळी झाडून पित्यानेच पोटच्या मुलाची हत्या केल्याची घटना सोमवारी अकोला येथे दुपारी १२ च्या सुमारास जठारपेठ चौकात ही घटना घडली.
मनीष भारती असे मृत मुलाचे नाव आहे. विशेष म्हणजे गुंड प्रवृत्तीचा हा मुलगा नुकताच तडीपार होता. शहरात या मनीषचा हैदोस वाढल्याने अकोला पोलिसांनी त्याला तडीपार केले होते.
मनीष भारती हा मुलगा संपत्तीच्या वादातून हातात शस्त्र घेऊन वडील बाबा भारती यांच्यावर हल्ला करण्यास निघाला होता. यावेळी बाबा भारती यांनी मुलावर बंदुकीतून गोळी झाडली. यात मुलगा मनीष ठार झाला.
दरम्यान पोलिसांनी संशयीत आरोपी बाबा भारती यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. बाबा भारती हे काँग्रेसचे नेते आहेत.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com