अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन, खंडणी उकळणाऱ्या तोतया पत्रकारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केले आहे. हा धक्कादायक प्रकार पंढरपूर शहरातील श्रीराम हॉटेल येथे घडला आहे.
याप्रकरणी तानाजी कांबळे (रा. लक्ष्मी टाकळी) व पांडुरंग शेळके या दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी कि, फिर्यादी चंद्रकांत आवटे (रा, लक्ष्मी टाकळी ता.पंढरपूर) याना कांबळे याने तुझ्यावर मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करतो, व ॲट्रॉसिटीची धमकी दिली.
तसेच दहा हजार रुपयाची खंडणी देखील मागितली. दरम्यान कांबळे याने स्वत पत्रकार असल्याचे सांगितले. दरम्यान कांबळे व त्याचा मित्र पांडुरंग शेळके व ज्योतीराम कांबळे यांना खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी रंगेहात पकडले.
यातील पांडुरंग शेळके घटनास्थळावरून फरार झाला आहे. घडलेली घटना अशी कि, तथाकथीत पत्रकार तानाजी कांबळे याने दहा हजार रुपये देण्यासाठी मागणी करून यातील तीन हजार रुपये व जेवणाचे बिल स्वीकारले होते.
उर्वरित सात हजार रुपये घेण्यासाठी त्याने फिर्यादीस हॉटेल श्रीराम येथे बोलावले होते. मात्र पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपी यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोसई हमीद शेख, हेकॉ सुरेश माळी करीत आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये