अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- राज्यातील विद्यापीठस्तरावरील अंतिम सत्राच्या परीक्षा विद्यार्थ्यांनी घरी बसून देण्यास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि कुलगुरु समीतीची बैठक पार पडली. या बैठकीत अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा घ्यायच्या यावर चर्चा झाली.
या बैठकीत विद्यार्थ्यांना घरी बसून परीक्षा देण्यास राज्यपालांनी मंजुरी दिल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं. परीक्षांबाबत कुलगुरुंनी २ दिवसात मार्गदर्शन करावं, असं आवाहन उदय सामंत यांनी केलं.
अंतिम वर्षाच्या परीक्षा सोप्प्या पद्धतीने घ्याव्यात यासाठी कुलगुरु प्रयत्न करत आहेत. उद्या १२ वाजता कुलगुरु समितीचा अहवाल जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
अंतिम वर्षाची परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होईल. त्यामुळे १५ ते ३० सप्टेंबरपर्यंत प्रॅक्टीकल परीक्षा घेण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
दरम्यान, ATKT विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील सोप्प्या पद्धतीने होणार असल्याचं सांगितलं. ३१ ऑक्टोबरपर्यंत परीक्षांचे निकाल लावण्याचं विद्यापिठांना बंधन असेल, असं उदय सामंत यांनी सांगितलं.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved