अखेर ‘त्या’ ज्वेलर्सच्या फरार बंधूंना अटक

Ahmednagarlive24
Published:

ठाणे : अखेर गुडविन ज्वेलर्सच्या फरार मालकांना बेड्या ठोकण्यात ठाणे आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गुडविन ज्वेलर्सचे मालक सुनीलकुमार मोहनन अकराकरण आणि सुधीरकुमार मोहनन अकराकरण या दोघांनाही ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

हे दोघे भाऊ मागील दीड महिन्यापासून फरार होते. १ हजार १५४ गुंतवणूकदारांची अंदाजे २५ कोटी रुपयांची फसवणूक या दोघा भावांनी केली होती, असा आरोप त्यांच्यावर होता.

यानुसार ठाणे पोलीस आयुक्तालयातील डोंबिवली, नौपाडा आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये या दोघांविरोधात गुंतवणूकदारांकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते.

गेल्या दीड महिन्यापासून फरार असलेले गुडविन ज्वेलर्सचे मालक सुनीलकुमार मोहनन अकराकरण आणि सुधीरकुमार मोहनन अकराकरण हे दोघे ठाणे न्यायालयात शरण होऊन कायद्यातील पळवाटा शोधून अटकपूर्व जामिनावर बाहेर राहण्याच्या तयारीत असल्याची माहिती ठाणे पोलिसांना शुक्रवारी मिळताच त्यांनी सापळा रचून दोघांना न्यायालयात हजर होण्यापूर्वीच ताब्यात घेतले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment