अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांडातील फरार प्रमुख आरोपी बाळ बाेठे याला अखेर काल पाेलिसांनी अटक केली. हैदराबाद येथून त्याला ताब्यात घेण्यात आले.
बाेठे हा वेळाेवेळी वेशांतर करून पाेलिसांना गुंगारा देत हाेता. अखेर पाच दिवस चाललेल्या पाेलिसांच्या मिशन हैदराबाद कारवाईला शनिवारी सकाळी साडेसहा वाजता यश मिळाले.
दरम्यान काल बोठे यास हैदराबाद येथून अलिशान फॉर्च्युनर कारमधूून त्याला पारनेर येथे आणण्यात आले होते.हे वृत्त माध्यमात आल्या नंतर ह्या प्रकाराबाबत अनेकांनी तरकार व्यक्त केली होती
बोठे यास सामान्य आरोपीप्रमाणे वागणूक न देता व्हीआयपी ट्रिटमेंट देण्यात आली. त्याच्यासाठी स्वतंत्र बराकही तयार करण्यात आली. त्याला विशेष जेवण दिल्याचेही सांगण्यात येते.
सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बोठे यास पारनेर येथे आणण्यात आल्यानंतर त्याच्या अटक प्रक्रियेस बराच विलंब लागला. त्यामुळे त्यास न्यायालयापुढे उभे करण्यात आले नाही.
रविवारी दुपारी पावणेएक वाजण्याच्या सुमारास त्यास मोठया पोलिस बंदोबस्तात चालत न्यायालयात नेण्यात आले. उपविभागिय पोलिस अधिकारी अजित पाटील, पोलिस निरीक्षक घनश्याम बळप, विजयकुमार बोत्रे हे न्यायालयात उपस्थित होते.
आज सकाळी बोठेला बेडया घालून रविवारी चालत पारनेरच्या न्यायालयात नेण्यात आले. बोठेच्या आवती भोवती पोलिसांचा गराडा असल्याने बोठे याच्या कुटूंबियांनाही त्याच्याजवळ जाऊ दिले गेले नाही.
बोठेची पत्नी सविता, मुलगा यश व हर्ष तसेच काही निवडक नातेवाईक सकाळपासूनच पारनेेर पोलिस ठाण्याच्या बाहेर सकाळपासून उपस्थित होेते.मात्र त्यांचीही भेट होवू शकली नाही.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|