अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-नै ऋत्य मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सोमवारी गती मिळाली. उत्तर महाराष्ट्र, संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातून नैऋत्य मान्सून आता परतला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडीने) अहवालानुसार, उत्तर भारत, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भातून नैऋत्य मान्सूनने निरोप घेतला आहे.

राज्यात डहाणू, नाशिक, नांदेड अशी मान्सूनची सीमा आहे. प. महाराष्ट्र व मराठवाड्यातून येत्या एक-दोन दिवसांत मान्सून परतण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बंगालचा उपसागर आणि तामिळनाडू, आंध्रच्या किनारी भागात ईशान्य मान्सून २८ ऑक्टोबरला दाखल होण्याचे संकेत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved