अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला होता. यामुळे अर्थचक्र अक्षरश कोलमडून पडले होते.
तसेच अनेकांच्या हातचा रोजगार गेल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ देखील आली आहे. यातच कोरोना काळात दळणवळण बंद असल्याने राज्यातील तमाम चालकांना स्वतःसह कुटूंबाला उपासमारीचा सामना करावा लागला आहे,
दरम्यान सणासुदीचा काळ आला असून चालकांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्यातील सर्वच चालक वर्गाला शासनाने आर्थिक मदत करावी,
अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या सचिव स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचेकडे केली आहे. कोरोनाच्या काळात रिक्षाचालक, ट्रक चालक,
इतर विविध वाहनांच्या चालकांचा रोजगार पुर्णपणे बंद झाल्याने या घटकाला स्वतःसह कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे जिकरीचे झाले आहेे.
अनेक कुटूंबे या परिस्थितीमुळे उध्दवस्त झाले आहे. दिवाळी सारखा सण तोंडावर आला असल्याने कुटूंबासह चालक हतबल झालेले आहे.
चालक हा बाजारपेठेचा प्रमुख घटक असुन करोनाच्या या परिस्थितीत चालकांच्या नशिबी आलेली अवस्था दुदैवी असून त्यांना शासनाने आर्थिक पाठबळ द्यावे अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved