माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर : श्रीगोंद्यातील तरुणाचा दशक्रिया विधी महावितरण कार्यालयाच्या आवारात केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह ३० जणांविरुद्ध सोमवारी (दि. ११) कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी येथे शेतात गवत आणण्यासाठी गेलेल्या संदेश आढाव वय १७ याचा शेतातील विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू झाला.

याप्रकरणी महावितरण कर्मचाऱ्यांच्या गलथानपणाचा निषेध करीत आढाव कुटुंबियांनी महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दशक्रिया विधी केला.

याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंह परदेशी, माजी महापौर अभिषेक कळमकर, हभप अजय महाराज बारस्कर संतोष पवार, अजित धस, प्रकाश बेरड श्रीकृष्ण खामकर यांच्यासह ३० जणांनी जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले.

तसेच संदेश आढाव याच्या मृत्यूप्रकरणी विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी यांचेवर कायदेशिर कारवाई करावी तसेच मृतांच्या कुटुंब यांना आर्थिक मदत करावी या मागणीकरीता आढाव याचा दशक्रियाविधी महावितरण कार्यालयात केल्याप्रकरणी पो. कॉ. सचिन गोरे यांच्या फिऱ्यादीवरुन गुन्ह्याची नोंद केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment