परळी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे धनंजय मुंडेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
धनंजय मुंडे यांनी केज मतदारसंघातील प्रचारसभेदरम्यान पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. ही सभा दोन दिवसांपूर्वी पार पडली होती. या सभेनंतर याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यामुळे परळीतील वातावरण चांगलेच तापले होते.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आज पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच शेकडो कार्यकर्ते परळी पोलिस ठाण्याकडे रवाना झाले. यावेळी धनंजय मुंडेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. परळी शहर पोलीस ठाण्यात कलम 500, 509, 294 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- ‘हे’ आहेत भारतातील टॉप 9 श्रीमंत शेतकरी, यादीतील सर्व शेतकरी आहेत कोट्याधीश !
- IOCL Recruitment 2025: इंडियन ऑइल अंतर्गत 97 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- SBI कडून 30 लाखांचे Home Loan मिळवायचंय मग तुमची महिन्याची कमाई किती हवी ? वाचा….
- सरकारी कर्मचाऱ्यांनो फक्त 10 दिवस थांबा ! दहा दिवसांनी महागाई भत्ता वाढणार, यावेळी किती वाढणार DA ? वाचा….
- बजेट फोन घ्यायचा आहे ? 6000mAh बॅटरी आणि दमदार फीचर्स असलेला Itel Power 70 पाहा